Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, चौथा आरोपी अटकेत

Spread the love

औरंंंगाबाद : कोरोनाग्रस्त रूग्णांना संजीवनी ठरणा-या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात चौथा आरोपी अटकपूर्व जामिनासाठी आला असतांना पकडला.

माधव शेळके (३०) असे चौथ्या आरोपीचे नाव आहे.तो परभणीचा रहिवासी आहे. मेडिकल दुकानचालकासह तिघांना अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुंडलिकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत १५ प्रिलला जेरबंद केले. तिघांच्या ताब्यातून तीन रेमडेसिविर इंजेक्शन, एक दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.१६) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील इंदिरा मेडिकल स्टोअर्सचे मालक अभिजीत नामदेव तौर (रा.सहयोगनगर, गारखेडा परिसर), मंदार अनंत भालेराव (रा.शिवाजीनगर, गारखेडा परिसर), जिल्हा सामान्य रूग्णालयाचा कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते (शिवाजीनगर, गारखेडा परिसर) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्यांची नावे आहेत. कोरोनाग्रस्त रूग्णांना संजीवनी ठरणा-या रेमडेसिविर इंजेक्शनचा गेल्या काही दिवसापासून मोठ्याप्रमाणात काळाबाजार सुरू आहे. मंदार भालेराव, अभिजित तौर, अनिल बोहते यांनी डॉक्टरचे प्रिस्कीप्शन पेपर नसतांना तसेच रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करणाNयास कोणतेही बील न देता २९ मार्च रोजी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील नेहरू महाविद्यालयाजवळ रूग्णाच्या नातेवाईकास इंजेक्शन चढ्या दराने विक्री केले होते.

या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाNया तिघांना जेरबंद केलेहौते.आज चौथ्या फरार आरोपीला बेड्या ठोकल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!