Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेला आरोपी छावणी पोलिसांनी केला वर्ग

Spread the love

औरंगाबाद – पुणे ग्रामीण गुन्हेशाखेने खंडणी प्रकरणी अटक केलेला आरोपी छावणी पोलिसांनी हाॅटेलवर गोळीबार झालेल्या गुन्ह्यात सुपा पोलिसांकडून संशयावरुन वर्ग करुन आणला.अद्याप त्याच्याकडे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.अशी माहितीसहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांनी दिली.
राहूल गायकवाड असे अटक आरोपीचे नाव आहे. नगर जिल्ह्यातील तो अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पडेगावातील रामगोपाल नगर परिश्ररात असलेल्या हाॅटेल मनीषवर ३१ मार्च रोजी पहाटे अडीच च्या सुमारास दोघांनी मोटरसायकलवर येत गोळीबार केला. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल गाडिलकर हा निष्पन्न झाला होता. फिर्यादी मनीष गायकवाड याच्या सोबंत ज्या मुलीचे लग्न ठरले होते. त्यामुलीने वयाचे अंतर जास्त असल्यामुळे विशाल गाडिलकर ला नकार दिला होता. अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली होती. व विशाल गाडिलकर आणि त्याच्या सोबंतच्या अनोळखी इसमाने हा गोळीबार केल्याचे छावणी पोलिसांच्या तपासात उघंड झाले होते. त्यानंतर टपासादरम्यान गाडिलकर बरोबर असलेला अनोळखी इसमाची ओळख पुणे पोलिसांना पटली व तो रेकाॅर्डवरील गुन्हैगार राहूल गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले व पुणे ग्रामीण गुन्हेशाखेने राहूल गायकवाडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्यावर छावणी पोलिसांनी त्याला पडेगाव हाॅटेल गोळीबार प्रकरणात वर्ग करुन आणले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हिवराळे करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!