Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा

Spread the love

अकोला : मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त तसेच माजी गृहमंत्र्यांवर १०० कोटींचा हप्ता मगितल्याचा आरोप करणारे परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिलाच  गुन्हा दाखल झाला आहे.  त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी  परमबीर सिंग  यांच्याविरुद्ध ते ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रारपोलिस महासंचालक तसेच  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकार्यांयचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!