Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय

Spread the love

मुंबई : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी मंडळाने नमूद केलेल्या शुल्कानुसार विद्यार्थ्यांना विभागीय मंडळामार्फत कार्यवाही करता येईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने २३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार विभागीय मंडळांनी २२ एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या परीक्षा अर्जांवर कार्यवाही करायची आहे.

दरवर्षी राज्य मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरण्याची संधी दिली जाते. यंदाही ही संधी देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नमूद केलेल्या विलंब शुल्कानुसार अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याबाबत मंडळाच्या संके तस्थळावर सूचना देण्यात आल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!