MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अखेर सीबीआय ने गुन्हा दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात हा गुन्हा  दाखल केला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील १०० कोटी लाच मागितल्याचा आरोपावरून त्यांची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Advertisements

दरम्यान अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणाऱ्या घरांवर सीबीआयने छापे टाकल्याचेही वृत्त  आहे. विशेष म्हणजे वरळी येथील सुखदा इमारतीत अनिल देशमुख यांचे घर आहे, त्या ठिकाणीही छापा टाकण्यात आला आहे

Advertisements
Advertisements

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयची विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

आपलं सरकार