CoronaIndiaUpdate : अशी आहे देशाची परिस्थिती , ७ राज्यांची स्थिती अधिक गंभीर

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली  :  देशात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखाहून अधिक आणि आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या 24 तासात देशात कोरोनाचे 345,147 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, यादरम्यान 2621 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही नवे उच्चांक गाठत आहे.

Advertisements

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 1,89,549 वर पोहोचली आहे. देशात 25,43,914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे संख्या एकूण बाधितांच्या 15.3 टक्के आहे. याआधी गुरुवारी कोरोनाचे नवे 3.32 लाख रुग्ण आढळले होते. तर, 2250 जणांचा मृत्यू झाला होता. भारतानं दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकलं असून भारत जगभरात पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

Advertisements
Advertisements

सार्वधिक मृत्यू महाराष्ट्रात 

कोरोनाबाधित  रुग्णांचा  बरे  होण्याचा दर 83.5 इतका झाला आहे. तर, कोरोनाने  होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा दर घटून 1.1 टक्के इतका झाला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 773 रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.. यानंतर दिल्ली 348, छत्तीसगड 219, यूपी 196, गुजरात 142, कर्नाटक 190, पंजाब 75 आणि मध्य प्रदेशमध्ये 74 जणांचा मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच 2017 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण मृतांच्या संख्येपैकी 76.98 टक्के इतका आहे.

दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक 66,836 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 2844, दिल्लीमध्ये 24331, कर्नाटक 26962, केरळ 28447, राजस्थान 15398 आणि छत्तीसगडमध्ये 17397 नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण बाधितांच्या संख्येपैकी 60.24 रुग्ण याच सात राज्यांमधील आहेत.

आपलं सरकार