AnilDeshmukhNewsUpdate : सीबीआयने अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध  सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अधिक चौकशीसाठी नागपूर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.  100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला असून त्यांच्या नागपूर आणि  मुंबईतील  घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.  याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या सह  इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून  हे 5 जण अनोळखी असल्याचे एफआयआर मध्ये नमुद करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी या रकान्यात अनिल देशमुखांचेही नाव आहे.

Advertisements

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या होत्या. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते कि, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.

Advertisements
Advertisements

कारवाईवर प्रतिक्रिया 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेली सीबीआय कारवाई म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे , असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. एका पत्राने एवढी मोठी कारवाई होऊ शकते का असा सवाल करत भाजपची ही राजकीय खेळी असून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण, अशा प्रयत्नाने सरकार अस्थिर होणार नाही, भाजपचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे कि , ‘अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा विश्वास मला वाटतो. ईडी, सीबीआय यांचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या वतीने वापर केला जात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी यावेळी केला. माझ्यावर देखील ईडीची कारवाई केली होती. ती सुद्धा राजकीय चालच होती. त्यामुळं आताही दूध का दूध और पानी का पानी होईल.’

काही काळ राजकारण थांबवावी  : संजय राऊत 

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सीबीआयच्या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे कि ,  “सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असे  मी मानतो. पण जर तसे  काही असेल, तर महाविकास आघाडीचे  सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ”. “सीबीआयची टीम आहे. सीबीआयचा एक अजेंडा आहे. उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. कायद्याच्या वर कुणी नाही. मला वाटते  जी कारवाई सीबीआयने केली आहे, त्यावर आत्ता कशाही प्रकारचे  मत व्यक्त करणे  कुणासाठीही चांगले  नाही. माझ्या मते अनिल देशमुख यांनी आपलं म्हणणे  सीबीआयसमोर मांडले  आहे. सीबीआय आपलं काम करत आहे. उच्च न्यायालयाने आपले  काम केले आहे. आणि महाविकासआघाडी देखील आपलं काम करत आहे”.

आपलं सरकार