Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : दुखणे अंगावर काढू नका , राजेश टोपे यांनी जोडले हात !!

Spread the love

मुंबई : दुखणे अंगावर काढू नका, कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. उशीर झाल्याने रुग्ण दगावल्याचा अनुभव मला सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहेत त्यामुळे काळजी घ्या असे कळकळीचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

टोपे  पुढे म्हणाले कि , “आपण सर्वजण करोनाच्या महामारीशी लढत असल्याने काही महत्वाच्या सूचना मी देऊ इच्छितो. आपल्याला थोडी लक्षणे आढळली तरी चाचणी करुन घ्यावी. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करा. कोणत्याची परिस्थितीत अंगावर दुखणे अंगावर काढू नये. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये माझा जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की उशीर झाल्याने रुग्ण दगावला, त्यामुळे कृपया दुखणे अंगावर काढू नका.
कोणत्याही परिस्थितीत लसीकरणास महत्व द्या. कोरोना महामारीत सुरक्षित ठेवण्यात लस महत्वाची कामगिरी बजावणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला बीपी, डायबेटीज, किडनी, ह्रद्य काहीही आजार असला तरी लस लाभदायी आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करुन राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावं,” असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

दरम्यान राज्यातील करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिशन ब्रेक द चेन हा कार्यक्रम सुरू केला असून अनेक ठिकाणी निर्बंध घातले आहेत. त्यांचे पालन झालंच पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!