Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : सावधान : गुलाबी WhatsAppच्या मोहात पडून या लिंकवर क्लिक करू नका

BERLIN, GERMANY - FEBRUARY 25: The Logo of instant messaging service WhatsApp is displayed on a smartphone on February 25, 2018 in Berlin, Germany. (Photo by Thomas Trutschel/Photothek via Getty Images)

Spread the love

नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राईमचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . यामध्ये आर्थिक गैरव्यवहाराबरोबरच तुमचा मोबाईल , सोशल मीडियाचे अकाऊंट हॅक करणे असे प्रकार होत आहेत . या गैर प्रकारात सध्या  सध्या व्हॉट्सअॅपवर असाच एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले की Whatsapp आता हिरव्या रंगात नाही तर पिंक म्हणजेच गुलाबी रंगात बदलण्यात येणार आहे. हा दावा करतानाच एक लिंक सुद्धा दिली आहे. सायबर तज्ज्ञांनी या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, म्हणून सावधान.

तुम्हाला येणाऱ्या व्हायरल मेसेज मध्ये दावा करण्यात येत आहे की, या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअॅप गुलाबी रंगाचे होईल. तसेच त्यात नवीन फीचर्स सुद्धा जोडले जातील. याला व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट सांगितले जात आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजहरिया यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, व्हॉट्सअॅप पिंक (Whatsapp Pink) संबंधी कोणतीही लिंक आल्यास तुम्ही सावध राहा. एपीके डाउनलोड लिंक सोबत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरस पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

या वृतानुसार राजशेखर राजहरिया यांनी सल्ला दिला आहे की, व्हॉट्सअॅप पिंकच्या नावावर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. लिंकला क्लिक केल्यानंतर फोन हॅक होत असून तुम्हाला तुमचा फोन वापरणे अवघड होईल. सायबर सुरक्षा संबंधित कंपनी वोयागेर इन्फोसेकचे संचालक जितेन जैन यांनी म्हटले की, युजर्संना सल्ला देण्यात येत आहे की, ते गुगल किंवा अॅपलच्या अधिकृत अॅप स्टोर शिवाय एपीके किंवा अन्य मोबाइल अॅपला इन्स्टॉल करू नका. या प्रकाराने तुमचे फोटो, एसएमएस, संपर्क आदी चोरी केले जाऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!