Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : समजून घ्यावे असे काही : कोरोनाविषयीचा हा नवीन शोध तुम्हाला माहित आहे काय ?

Spread the love

मास्क घातल्याने कोरोनापासून संरक्षण होण्यास मोठी मदत । गर्दीच्या ठिकाणी जाणे  टाळणे आवश्यक आहे.


व्हेंटिलेशन, एअर फिल्ट्रेशन,  पीपीई किट यासारख्या गोष्टींवर भर देणे


कोरोनाच्या वाढत्या संसर्गापुढे जग यापुढे  अक्षरशः हतबल झाले आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण करूनही कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसत नाही. त्यासाठी लॉकडाऊन , सोशल डिस्टन्सिंग, मास्क , सॅनेटायझरचा वापर करूनही कोरोना वाढतच असल्याने संशोधक कोरोनाला समजून घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असताना लॅन्सेटच्या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अहवालात  कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


लॅन्सेटच्या अहवालानुसार कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा पुरावा असल्याचा दावाही  या समितीने केला आहे. सहा तज्ज्ञांच्या समितीने सखोल अभ्यास करून अहवालात ही बाब नमूद केली आहे. या समितीत अमेरिका, इंग्लंड, कॅनडामधील तज्ज्ञांचा समावेश आहे. यात रसायनशास्त्रज्ञ जोस लुईस जिमेनेज यांचाही समावेश आहे. ते कॉऑपरेटिव्ह इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन इनव्हारनमेंटल सायन्स आणि कॉलोरांडो विद्यापीठात कार्यरत आहेत.

दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठानेही लॅन्सेटच्या  या अहवालाची समीक्षा  केली आहे. त्यांनीही हवेतून विषाणू पसरत असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. मोठ्या ड्रॉपलेटमधून करोना पसरतो यात कोणतेच तथ्य नाही. उलट हवेतून करोना परसत असल्याचे सांगण्यात आले  आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने  हा अहवाल गंभीरतेने घेऊन विषाणू रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ही नमूद केले आहे.

या अहवालात  कोरोनावर रिसर्च करण्याऱ्या तज्ज्ञांनी स्कॅगिट चॉयर आउटब्रेकची संज्ञा मांडली आहे. यात एका व्यक्तीकडून ५३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात केलेल्या निरीक्षणात प्रत्येक व्यक्ती एकाच पृष्ठभागावर हात लावण्यास गेली नव्हती आणि एकमेकांच्या संपर्कातही आली नव्हता. तरीही त्या लोकांना कोरोनाची लागण झाली. याचा अर्थ करोना हवेतून पसरतो असा निष्कर्ष मांडण्यात आला. कोरोनाचा प्रसार बंदीस्त जागेपेक्षा बाहेर सर्वाधिक वेगाने पसरत असल्याचे  यात सांगण्यात आले  आहे. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना लक्षणे  दिसत नाहीत. मात्र त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे मोठ्या ड्रॉपलेटपेक्षा हवेतून सर्वात जास्त वेगाने करोनाचे फैलाव होत असल्याचे  मत या अहवालात मांडण्यात आले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!