Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिवादन : जातीअंताची लढाई आणि महात्मा फुले

Spread the love

जातीय व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी बंडाचे निशाण फडकविले त्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची १९४ वी जयंती साजरी करताना त्यांच्या कार्य कर्तृत्वाला  वंदन करताना सभोवतालच्या परिस्थितीचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी संपुर्ण आयुष्य ज्या कार्यासाठी झोकून दिले होते ते जाती अंताचे कार्य आजच्या घडीला कुठपर्यंत आले आहे, याचाही मागोवा घेणे गरजेचे आहे. कोणत्याही महापुरुषांची कसोटी ही त्याने इतिहासात नेमकी कोणती कामगिरी बजावली आहे त्यावर अवलंबून असते.

आज २१ व्या शतकात जग झपाट्याने बदलत असताना, भारत एक महासत्ता बनू पाहत असताना भारतीय समाज व्यवस्थेतही प्रचंड उलथापालथ होत आहे. हजारो वर्षापासून माणसा माणसात विषमतेच्या भिंती निर्माण करणाऱ्या जातीव्यवस्थेला अखेरची घर घर लागली आहे.

दिवा जसा विझण्यापूर्वी भडभडतो आणि अधिक प्रकाश द्यायला लागून झर्रकन विझून जातो , तशी अवस्था जातीव्यवस्थेची झाली आहे.
क्रांती ज्योतिराव फुले यांनी जातीव्यवस्था विरोधात जे क्रांतीकारी कार्य केले त्याला आधुनिक भारताच्या इतिहासात तोड नाही. त्यामुळे क्रांतीबांनी जे जाती अंताचे कार्य हाती घेतले ते त्यांचे शिष्योत्तम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तडीस नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका पिढीकडून ती सहज साध्य होत नाही म्हणून आता मरणासन्न जाती व्यवस्थेला शेवटचा जोरदार धक्का सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने द्यायला हवा, हीच खरी महापुरुषांना अभिवादन ठरेल.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतनिमित्त कोटी कोटी प्रणाम

अश्वदिप अशोक टिपले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!