Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : IPS संजय पांडे राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Spread the love

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना महाराष्ट्रच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत हा कार्यभार अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे होता. साईड पोस्टिंगमुळे संजय पांडे नाराज होते. या संदर्भात त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठकही झाली होती. तसेच संजय पांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले  होते . अखेर महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आदेश मंजूर करत राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे सोपवला. अतिशय शिस्तप्रिय, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी संजय पांडे यांची ओळख आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!