Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : प्रसिद्ध सिने -नाट्य लेखक , दिग्दर्शक मच्छिन्द्र मोरे यांचे कोरोनामुळे निधन

Spread the love

मुंबई : प्रसिद्ध सिने -नाट्य लेखक , दिग्दर्शक , पटकथाकार, सिने गीतकार , कवी मच्छिन्द्र मोरे, 64  यांचे शनिवारी सकाळी ८ वाजता कोरोनाने निधन झाले. त्यांच्यावर बीपीटी हॉस्पिटल, वडाळा येथे उपचार चालू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवाववर दुपारी शिवाजी पार्कवरील समशानभूमीत अंत्यसंस्कार झाले . एका प्रतिभावान लेखक, कवीला सिनेसृष्टी मुकली आहे.


मनाला चटका लावणारी मच्छिन्द्र मोरे यांची पोस्ट

आता बरं वाटतंय, रिकवरिच्या दिशेने वाटचाल चालू झालीय..

लय जपत आलो स्वतः ला आजवर पण अखेर
करोनान चंचूप्रवेश केलाच मायला… कुठून घुसला असावा कळलच नाही
बारामतीला पुतण्या साठी मुलगी बघायला गेलो होतो
येताना या कारट्याला अंगावर घेऊन आलो, थोडा प्रसाद पुतण्याला पण मिळालाय
चोवीस तास सोबत असणारी बायको मात्र शाबुत आहे,हे नशीब
१७ मार्चला आम्ही उभायतानी लस घेतलीय, तरीही हे नाठाळ बेणं माझ्या राशीला कसं आलं,हे एक कोडेच आहे
बीपीटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालोय,
उत्तम स्टाफ आहे, घरच्या दोन नातेवाईक इथं मेडिकल अधिकारी आहेत, स्पेशल रुम आहे, उत्तम भोजन व्यवस्था आहे
दोन दिवस झालेत, हॉस्पिटलमध्ये येऊन
अॅडमिट होण्यापूर्वी मात्र खुपच त्रास झाला, आता बरं वाटतंय, रिकवरिच्या दिशेने वाटचाल चालू झालीय
करोनाचे अंतरंग आणि ताकद समजतेय मित्रानो
आपण ही सर्वजण काळजी घ्या…

मच्छिंद्र मोरे यांचा नाट्य – चित्रपट सृष्टीतील प्रवासाचा थोडक्यात आढावा

नाटक (मराठी)

1. अंधपर्व 1992 (लेखक)

2. फियास्को 1992 (लेखक)

3. झुलवा 1994 (गायक)

4. लोकशाहीचा तमाशा 1994 ( लेखक )

5. टेम्ट मी नॉट 1994 (गायक )

6. बकरी 1996 (लेखक)
कलाकार – मकरंद अनासपुरे यांचे पहिले व्यावसायिक नाटक

7. तीन पैश्याचा तमाशा 1996 (गायक)

8. संकल्प 1997 (लेखक व गीतकार)
A Stage Show of on the eve of 50th Anniversary of Indian freedom
( witnessed by Shri. I. K, Gujaral (Prime Minister)
, Shri. R. Venkatraman ( President of India

9. हॅप्पी प्रिन्स 2003 (लेखक)

10. कबिरा खडा बाजार 2006 (Writer)
Performed by Natraj Natya Kala Mandir, Baramati
(Chairman Shri. Ajit Pawar )

11. दिल्लीची किल्ली 2008 (लेखक)
कलाकार- मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळे, अरुण कदम, रमेश वाणी.

12. आनंदरंग 2009 ( लेखक व गीतकार)
A Stage show on the eve of 150th anniversary of Mumbai University
(witnessed by 500 Vice chancellors from all over the world )

13. काय बाई सांगू 2010 (गीतकार)
Performed by Surekha Punekar,Bhalchandra ( Bhau) Kadam
Produced by Suyog

14. Hirkani 2011 (लेखक व गीतकार)

चित्रपट (मराठी)

1. मुक्काम पोस्ट लंडन 2005
( लेखक, दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शक)
कलाकार – भरत जाधव, मोहन जोशी, मृण्मयी लागू

2. माझा नवरा तुझी बायको 2006
(गीतकार व सहाय्यक दिग्दर्शक)
कलाकार – भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, क्रांती रेडकर

3. बकुळा नामदेव घोटाळे 2007
(लेखक व गीतकार)
कलाकार – भरत जाधव, सिद्धार्थ जाधव व सोनाली कुलकर्णी

4. इरसाल गावची इरसाल माणसं (अप्रकाशित) (गीतकार)

5. मुक्ती 2012 (लेखक/ दिग्दर्शक/गीतकार/संगीत)
कलाकार– नंदू माधव, तेजस्विनी पंडित, नागेश भोसले, मिलिंद शिंदे

6. बाजीराव 2012 (अप्रकाशित)
(लेखक/दिग्दर्शक/गीतकार)

कलाकार – अशोक समर्थ, तेजा देवकर, अनंत जोग, रमेश देव, शीतल पाठक

नाटक (हिंदी)

जानेमन 2002 (लेखक )
National school Of Drama, Delhi’s Production &
Internationally famous play )
Directed by Shri. Waman Kendre
Costume by Bhanu Athayya (Oscar award winner )

मोहनदास 2008 (लेखक)

वेधपश्य 2007 (लेखक)

राजदर्शन 2009 (गीतकार)

चित्रपट (हिंदी)

1. वासुदेव बळवंत फडके 2007 (गीतकार)
( रमेश देव प्रोडक्शन )

2. रज्जो 2013 सहलेखक व अभिनय

आपलं सरकार

Click to listen highlighted text!