Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यातील जनतेला 10 हजार कोटी रुपयांचे विशेष पैकेज द्या, बसपाची राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला दहा हजार कोटी रुपयांचे विशेष पैकेज जाहीर करून प्रत्येकी  दहा हजार रुपए सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना  व गोरगरीबांकरीता देण्यात यावे अशी मागणी बसपाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


बसपा प्रमुख  कुमारी मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार खासदार वीर सिंग , राष्ट्रीय महासचिव आणि प्रदेश प्रभारी  प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्या मार्गदर्शनाखाली  बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  संदीप ताजणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन सदर निवेदन राज्यपालांना सादर करण्यात आले . यावेळी शिष्टमंडळामध्ये प्रशांत इंगळे,  महासचिव महाराष्ट्र राज्य, राम सुमैर जैसवार महासचिव महाराष्ट्र राज्य तसेच राजपाल  गावंडे सचिव महाराष्ट्र राज्य  आदींची यावेळी उपस्थिती होती .

या निवेदनात म्हटले आहे कि , राज्यात करोनाचा भयंकर उद्रेक झाला असल्याने संपूर्ण जनता हवालदिल झाली आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून अनेक रुग्णांना उपचारा अभावी दिवस काढावे लागत आहेत दुसरीकडे लाॅकडाउन स्थितीमुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  अशा या संकट समयी राज्यातील जनतेला राज्य सरकारने दिलासा देणे आवश्यक आहे .

निवेदनातील प्रमुख मागण्या 

१) १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खाजगी मधील सर्व आरोग्य सेवा अनुदानित करावी तसेच आरोग्य यंत्रणेवरील भार कमी करण्याचे उपाय करावे आणि कुणीही उपचाराविना राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

२) राज्यात विनावेतन असणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्वांना प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे कुटुंबातील किमान चार सदस्यांना तरी ही मदत मिळावी.

३) तपासणी केंद्र वाढवावे आणि आठ तासाच्या आत मोबाईलवर अहवाल द्यावा यातून रुग्णांवर लगेच उपचार सुरू होतील.

४) रेमडीसिवर इंजेक्शन ची किंमत कमी केल्यानंतरही एमआरपी नुसार वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांना हे इंजेक्शन निशुल्क उपलब्ध करून द्यावे.

५) सरकारने लाॅक डाऊन स्थिती तयार केलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय उद्योगधंदे आणि इतर कामे ठप्प आहेत. लोकांकडे पैसे नाहीत त्याकरिता वीज बिल माफ करावे.

६) विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी

७) शाळा महाविद्यालयांचे शुल्क माफ करावे

८) खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मोफत द्यावे

९) व्यापारी वर्ग हॉटेल्स व दुकाने यांना संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू राहण्यास परवानगी द्यावी.

१०) दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात विद्यार्थ्यांचे जीव विनाकारण धोक्यात घालू नये.

या मागण्या मान्य न झाल्यास बसपाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप जी ताजने यांनी दिला आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!