Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राहुल गांधी यांचा लसीच्या निर्यातीला विरोध, पंतप्रधानाला लिहिले पत्र

Spread the love

नवी दिल्ली : लस निर्यात तत्काळ रोखायला हवी तसेच नियम-दिशानिर्देशानुसार इतरही लसींना लवकरात लवकर परवानगी दिली जावी’ अशी मागणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे . या धोरणामुळे कोरोना संक्रमणाच्या सद्य तेजीचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशारा राहुल गांधी यांनी या पत्रातून दिला आहे. दरम्यान देशाच्या गरजेनुसार कोरोना लसीकरण प्रत्येकासाठी उपलब्ध व्हायला हवे , असा आग्रह राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून केला आहे.

या पत्राद्वारे लसीकरणाच्या गतीला खिळ घालण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केल्याचा आरोप करतानाच राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली असून मोदी सरकारला त्यांनी काही सूचनाही दिल्या आहेत. तसेच आपल्या सात मागण्या राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून मांडल्या आहेत. यामध्ये लस निर्मात्यांना आर्थिक मदत, प्रत्येकाला लस घेण्याची संधी आणि राज्यांना योग्य प्रमाणात लसीचा पुरवठा करण्याच्या सूचनांचा समावेश आहे.

दरम्यान देशात केवळ ५.५ दिवस पुरेल एवढा लस साठा उपलब्ध आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, कोविड लस निर्यात करण्यावर कोणतीही बंदी नाही आणि देशातील आवश्यकता लक्षात घेऊन परदेशांना लसीचा पुरवठा सुरूच राहील, असे गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते . या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिले आहे.

‘देश सध्या महामारीच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत आहे. आपल्या वैज्ञानिक आणि डॉक्टर्सनं मिळून करोना संपुष्टात आणण्यासाठी करोना लस बनवली, परंतु सरकारने लसीकरण कार्यक्रम योग्य पद्धतीने लागू केला नाही. देशात लसीकरण एवढ्या हळूवारपणे होत आहे की ७५ टक्के लोकांना डोस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल’ असे राहुल गांधी यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!