Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित , ३०१ रूग्णांचा मृत्यू

Spread the love

मुंबई :  गेल्या २४ तासात राज्यात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ५, ३४, ६०३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. दरम्यान, आज ४५ हजार ३९१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २६,९५,१४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.९६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१६,३१,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,८८,५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९५,०६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,१५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान पुण्यात दिवसभरात ५ हजार ६४७ कोरनाबाधित वाढले असून, ४४ रूग्णांचा मृत्यू शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख १८ हजार २९ इतकी  झाली आहे.  आजपर्यंत ५ हजार ६५४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.  दरम्यान आज ४ हजार ५८७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ६२ हजार ४२० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!