Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवात

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या याचिका फेटाळल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार १५ दिवसात सीबीआयला आपला चौकशी अहवाल द्यायचा आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयचे अधिकारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचाही उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

परमबीर सिंह व अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार व प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते. दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे. या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले त्यानुसार ही  चौकशी सुरु झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!