CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात राज्यात ५६ हजार २८६ नवे रुग्ण तर ३७६ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५६ हजार २८६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज राज्यात एकूण ३७६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३२२ इतकी होती. काल ही संख्या ५९ हजार ९०७ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाली असून ही घट ३ हजार ६२१ इतकी आहे, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे.

दरम्यान  गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३६ हजार १३० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ३० हजार २९६ इतकी होती. तर आतापर्यंत एकूण २६ लाख ४९ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०५ टक्क्यांवर आले आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार ३१७ वर जाऊन पोहचली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९७ हजार २४२ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८३ हजार ६९३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ६९ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६१ हजार ७११ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३४ हजार ९१९ इतकी आहे.

या बरोबरच औरंगाबादमध्ये १८ हजार ०८२, अहमदनगरमध्ये १५ हजार २९२ इतकी आहे. तसेच नांदेडमध्ये ही संख्या ११ हजार ६५९ इतकी आहे. जळगावमध्ये ८ हजार २१२, तर रायगडमध्ये एकूण ७ हजार ५६३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ८४७, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ५६१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ८८५ इतकी आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी १३ लाख ८५ हजार ५५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२ लाख २९ हजार ५४७ (१५.१० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ०२ हजार ६१३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २२ हजार ६६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.