Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : वाळूज -औरंगाबाद मार्गावर रुग्णवाहिका पेटली !!

Spread the love

Like | Share | Subscribe

औरंगाबाद : गंगापूर उप जिल्हा रुग्णालयाच्या  रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. हि रूग्ण वाहिका गंगापूरकडून  औरंगाबादकडे  येत होती. तेव्हा वाळूज येथील बजाज कंपनीच्या जवळ या रूग्णवाहिकेला आग लागली. सुदैवाने या रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. चालकाने प्रसंगावधान दाखवून आग लागल्याचे लक्षात येताच उडी मारल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आग लागल्यावर काही वेळातच रुग्णवाहिकेत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, याचे हादरे दूरपर्यंत ऐकू गेलो होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. पण तोपर्यंत रुग्णवाहिका जळून खाक झाली होती. यामुळे बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

या विषयी खुलासा करतांना पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले की, फोर्स कंपनीची ४०७गाडी आहे. आॅक्सिजन सिलेंडर सोबतच काही मेडिकल इक्विपमेंट होते घटनास्थळाचा पंचनामा झाला. टेंपो चालकाची चूक आहे का ? अन्य कोणाची अहवाल फाॅरेन्सिक लॅब ला पाठवला आहे. अधिक तपास सुरु आहे. 

सदर रुग्णवाहिका  भेंडाळा आरोग्य केंद्राची होती. औरंगाबादकडे येत असताना अचानक रुग्णवाहिकेतून धूर निघताना चालकाला दिसला. त्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला घेतली. तेवढ्यात रुग्णवाहिकेने पेट घेतला. त्याचवेळी रुग्णवाहिकेत असलेले दोन ऑक्सीजन सिलेंडर पैकी एकाच स्फोट झाला. चालकाने बाजूला धाव घेतल्याने तो बचावला. तात्काळ गरवारे अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. मात्र, स्फोट झाल्याने रुग्णवाहिका जळून खाक झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!