Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : विना मास्क फिरणाऱ्या मुंबैकरांकडून ४९ कोटींचा दंड वसूल

Spread the love

मुंबई : महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सांगूनही लोक काही मास्क घालायला तयार नाहीत . एकट्या मुंबईत विनामास्क  फिरणाऱ्या नागरिकांकडून आतापर्यंत  ४९ कोटींचा दंड  वसूल करण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभरात १७,८५३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले असून रेल्वेतही कारवाईने वेग घेतला आहे. पोलीस, रेल्वे आणि मुंबईभर पालिके ने के लेल्या कारवाईतून एका दिवसात ३६ लाख ४२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शासनाने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही मुंबईत अनेक जण विनामुखपट्टी फिरत असताना आढळून येतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई पालिकेने तीव्र केली आहे. मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिके ने फेब्रुवारीमध्येच क्लिन अप मार्शल्सची संख्या दुप्पट के ली. तसेच दररोज २५ हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे गाडय़ांमध्ये मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रत्येक रेल्वे मार्गावर १०० यानुसार एकूण ३०० मार्शल्स नेमण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!