Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : मोठी बातमी : पंतप्रधानांची दिल्लीत तर राज्यात मुख्यमंत्र्यांचीही मंत्रिमंडळासोबत बैठक

Spread the love

मुंबई । नवी दिल्ली  : देशात वाढत असलेली कोरोनाबाधितांचा संसर्ग लक्षात घेता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरणाबाबत चर्चा होत आहे. केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉक्टर विनोद पॉल या बैठकीला उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची  दुपारी तीन वाजता बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे . कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आणखी कडक निर्बंध लागू करायचे कि लॉक डाऊन घोषित करायचा यावर  या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्य प्रदेशाने महाराष्ट्राची सीमा केली बंद

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटले आहे कि , महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असून मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्राची सीमा बंद करण्याचा आणि छत्तीसगड मधील प्रवाशांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची स्थिती गंभीर 

दरम्यान भारतात रविवारी झालेली नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद या वर्षातील सर्वाधिक नोंद आहे .  93,249 हि  सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यानंतर आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,24,85,509 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने  ही आकडेवारी जारी करत माहिती दिली आहे. 18 सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच देशात एकाच दिवसात इतक्या अधिक रुग्णांची नोंद झाली आहे तर अधिकृत आकडेवारीनुसार शनिवारी कोरोनामुळे 513 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेता कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार एका दिवसात देशात 90 हजारहून अधिक रूग्ण समोर येत आहेत. मुंबई शहरात कोरोनाचे 9,108 नवे रुग्ण समोर आले आहेत. याआधी 17 सप्टेंबर 2020 ला महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 24,619 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने  म्हटले , की 1,84,404 आणखी रुग्ण समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 2,03,43,123 झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!