Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करा : देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई । दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करावी तसेच अटकेत असलेले निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


सोबतच IFS दर्जा असणारे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांना सहआरोपी करून त्यांनाही अटक आणि बडतर्फ करण्यात यावे आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन नामवंत विशेष सरकारी अभियोक्ता उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना या बाबत लिहिलेल्या पात्रात त्यांनी म्हटले आहे कि , महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला मुळीच शोभादायक नाही .’अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरेतर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?’, असे संतप्त ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकासआघाडी सरकारवर थेट शब्दांत निशाणा साधला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!