Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राकेश टिकैत यांच्यावरील हल्ल्याचे दिल्लीत पडसाद

Spread the love

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या गाडीवर शुक्रवारी दुपारी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचे पडसाद दिल्लीतही उमटले असून  दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर ट्राफिक जाम करत आपला रोष व्यक्त केला. दरम्यान दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी सीमा सील करण्यात आल्या. टिकैत यांनी या प्रकरणी भाजपवर टीका केली असून उत्तर प्रदेशात भाजप आमदार आणि खासदारांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही असा इशारा एका ट्विटद्वारे दिला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलकांमुळे राष्ट्रीय महामार्ग ९ आणि २४ दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोडसहीत बंद करावा लागला. तसंच चिल्ला सीमेवरही आंदोलनामुळे ट्राफीक रोखण्यात आलं होतं. त्यामुळे नोएडा सीमेवर अनेक प्रवासी गाड्यांत अडकून पडलेले दिसले.

दम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्ली – मेरठ एक्सप्रेस वे एक तासांहून अधिक काळासाठी रोखून धरला होता. मात्र, टिकैत यांनी केलेल्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा केला. परंतु, एव्हाना वातावरण तणावपूर्ण बनले  होते. शेतकरी नेत्यांवर आणि आंदोलकांवर गुंडांनी हल्ले केले तर भाजपच्या आमदार आणि खासदारांना रस्त्यावरही फिरू दिलं जाणार नाही, असे  बीकेयू नेते राकेश यांनी म्हटले आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांती कायम राखण्याचं आवाहनही केले.

शुक्रवारी अलवरच्या हरसौरा भागातील सभेनंतर  राकेश टिकैत बानसूरकडे निघाले होते. त्याचवेळी ततारपूर भागात त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. तसंच काही अज्ञातांनी राकेश टिकैत यांच्या अंगावर शाईदेखील फेकली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!