Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : चिंताजनकच : राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित रुग्ण , २०२ मृत्यू !!

Spread the love

मुंबई । कोरोनाचा संसर्ग राज्यात  मागील काही दिवसांपासून थांबायला तयार नाही . दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, विशेष म्हणजे रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे.  गेल्या २४ तासात  राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज २४ हजार १२६ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!