Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : “ती” पिडीता उत्तर प्रदेश बालकल्याण समितीकडे सूपूर्द

Spread the love

जगदीश कस्तुरे । औरंगाबाद


औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्कारातील गुन्ह्रातील पिडीतेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे २५मार्चला तिला राजस्थान बालकल्याण समितीकडे सूपूर्द करण्यात आले. अंदाजे दोन महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशातील मिर्झापूर  येथील अल्पवयीन मुलीशी लग्न करणार्‍या रिक्षा चालकाला उस्मानपुरा पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केले होती. त्यानंतर या पिडीतेची रवानगी महिला बाल सुधार गृहात करण्यात आली. त्या ठिकाणी राहात असतांना घरी जाऊ देत नाही म्हणून तिने पंख्याला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब न्यायालयाच्या निर्दशनास आली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर  बालकल्याण समितीकडे त्या मुलीला सूपूर्द करण्यात आले.


या विषयी खुलासा करतांना बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड.ज्योती पत्की म्हणाल्या की, 0ते १८वय वर्ष काळातील पिडीत मुली मुले ही बालकल्याण समिती सांभाळत असते.ही मुले जेंव्हा सांभाळण्याकरता समितीकडे येतात.तेंव्हा या पिडीत मुलांचा स्वभाव, गुण, अवगुण कळायला लागतात. उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या या प्रकरणात ती अल्पवयीन पिडीता हॅबीच्यूअल होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तिने जवळपास १५ते १६जणांची नावे घेतली. तिने समितीला असेही सांगितले की, घरातून पळून जाणे किंवा बाहेर पडणे हा प्रकार काही तिच्यासाठी नवीन नाही या पूर्वीही तिने असे उद्योग केलेले आहेत.तसेच वैद्यकीय अहवालानुसार तिच्यावर बलात्कार झालेलाच नव्हता. पण कायद्याच्या तांत्रिक अडचणीमुळे तसा गुन्हा दाखल करावा लागला.

अॅड.ज्योती पत्की  पुढे म्हणाल्या कि , अशी पिडीत मुली मुले जेंव्हा आम्ही सांभाळतो तेंव्हा समितीचा प्रांजळ उद्देश असतो की, अशा पिडीतांचे पालन, पोषण, आणि पुर्नवसन करण्याचे काम बालकल्याण समिती करत असते.पण हे करत असतांना अनेक कठीण प्रसंगांना पिडीतांच्या सवयींचा समितीला निडरपणे सामना करावाच लागतो. पहिल्या प्रयत्नात तर पीडित मुले मुली खरे सांगतीलच असे नाही .दुसऱ्यांदा , तिसऱ्यांदा कधी तरी ते खरे बोलतात . अशा काळात पिडीता या त्यांच्या रहिवासी जिल्ह्यात असलेल्या बालकल्याण समितीकडे जास्त सुरक्षित असतात म्हणून त्या पिडीतेला राजस्थान बालकल्याण समितीच्या हवाली केले असून ती सज्ञान झाल्यावर तिच्या पालकांकडे सोपवली जाणार आहे.

दरम्यान या विषयी बोलतांना पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे म्हणाले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर अशा पिडीतांचा ताबा बालकल्याण समितीकडे असतो व त्यांच्याबाबतीत सर्व निर्णय समिती घेत असते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!