Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती

Spread the love

मुंबई :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून गणेश श्रीधर रामदासी यांची पदोन्नती झाली आहे. मंत्रालयात संचालक (प्रशासन व तांत्रिक कक्ष) या पदावर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. रामदासी हे यापूर्वी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2001 मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुखपदी झाली होती. केंद्रशासनात प्रतिनियुक्तीवर असताना माजी केंद्रिय राज्यमंत्री तारिक अन्वर तसेच माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी लाभली होती. प्रसारभारतीमध्ये संचालक (प्रशासन) या पदावर त्यांची केंद्रशासनामध्ये सुमारे चार वर्षे प्रतिनियुक्ती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!