Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतके दिवस त्या घरीच विलगीकरणातहोत्या. पण मंगळवारी त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात 23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रश्मी ठाकरे यांनी थोडे दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा घेतली होती. दरम्यान रश्मी ठाकरे यांना नेमक्या कुठल्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याबाबत अजून अधिकृतपणे माहिती समजलेली नाही.

Click to listen highlighted text!