Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी वाढली मुदत

Spread the love

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ केली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली असल्याने . नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात असल्याचे म्हटले आहे . ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, कोणत्याही दंडाशिवाय आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर एकच झुंबड उडाली होती. नागरिकांनी आज शेवटच्या दिवशी सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी पॅनकार्ड आधार जोडणीसाठी गर्दी केलेली दिसली. एकाच वेळी अनेक युझर्सनं लॉग इन केल्याने आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे वेबसाईटवर आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. परंतु, उद्या याच कामासाठी १००० रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार असे वाटत असताना आयकर विभागाकडून पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!