Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यात कोरोना रुग्णांत घट । धक्कादायक :  १३९ रुग्णांचा मृत्यू 

Spread the love

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत.  गेल्या २४ तासात  राज्यात २७ हजार ९१८ नवीन करोनाबाधित वाढले असून, १३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५४ हजार ४२२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर,  राज्यात आज रोजी एकूण ३,४०,५४२  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान रविवारी राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र दोनच दिवसांत हा आकडा १२ हजारांनी खाली आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. मात्र काल आणि आज कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली असली तरी मृत्यूची संख्या वाढली आहे.

याशिवाय आज २३ हजार ८२० रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण २३,७७,१२७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.७१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज (मंगळवार) अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!