Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NewsInTrending : मोठी बातमी : राष्ट्रवादीने नाकारलेल्या “त्या ” पवार भेटीवर अमित शहा यांनी असे केले शिक्कामोर्तब !!

Spread the love

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि  गृहमंत्री अमित शहा  यांची अहमदाबादमध्ये भेट झालीच नाही असा  राष्ट्रवादीचा खुलासा प्रसिद्ध होत नाही तोच  या भेटी संबंधी खुद्द अमित शहा यांनी सर्वकाही जाहीर करण्यासारखे नसते , सूचक वक्तव्य करीत या भेटीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब  केले  आहे.

दरम्यान अमित शहा यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे  दिली. अमित शहा यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटी बाबत प्रश्न विचारला. सर्वकाही जाहीर करण्यासारखं नसतं, असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे. अमित शहांचं वक्तव्य हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर शिक्कमोर्तब करणारं असल्याचं चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्रात आता राजकीय भूकंप येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी अहमदाबादला गेले होते. अहमदाबादमध्ये त्यांची भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. एका गुजराती वृत्तपत्राने ही बातमी दिली. त्यावरून अमित शहा यांना आज दिल्ली प्रश्न केला गेला. सर्वकाही जाहीरपणे सांगायचं नसतं, असं अमित शहा म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!