Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पंडित नाथराव नेरलकर यांचे निधन

Spread the love

औरंगाबाद : संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरलकर यांचे आज ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पं. नेरलकर यांचे वय ८६ वर्षे होते. (जन्म १६ नोव्हेंबर १९३५) पं. नेरलकर यांना अतिशय मानाच्या अशा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने २०१४ मध्ये सन्मानीत केल्या गेले होते.
गानमहर्षी डाॅ. आण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी बालपणापासून नांदेड येथे गायनाचे धडे गिरवले. १९५८ ला त्यांची “अनंत संगीत महाविद्यालय” ची स्थापना केली. त्या माध्यमांतून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे संगीत अध्यापनाचे काम चालू होते.

सरस्वती भुवन महाविद्यालयात त्यांनी संगीत विभाग प्रमुख म्हणून मोलाचे कार्य केले. कोलकोत्ता येथील संगीत रिसर्च अकादमीत गुरूपदी त्यांची नियुक्ती सन्मानपूर्वक करण्यात आली होती. राज्यात व देशभरात त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले होते. मराठवाडा परिसरात विविध संगीत महोत्सवांच्या माध्यमांतून शास्त्रीय संगीत प्रसाराचे त्यांचे कार्य अतुलनीय असे राहिलेले आहे. वयाची ८५ ओलांडली तरी त्यांची संगीत साधना अविरत चालू होती, त्यांनी विविध रागांतील अप्रतिम अशा जवळपास ५१ बंदिशींची रचना केली होती ज्या आजही त्यांचा शिष्यवर्ग व इतर मान्यवर गातात. पं. नेरलकर यांच्या पश्चात गायिका हेमा उपासनी नेरलकर ही मुलगी, संगीतकार जयंत नेरलकर व क्रिडा क्षेत्रातील तज्ज्ञ अनंत नेरलकर ही मुलं, सुना, जावाई, नातवंडं असा परिवार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!