Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : डझनभर मोटरसायकल चोरणारा धन्या जेरबंद

Spread the love

औरंगाबाद – नगर,नाशिक,शहर परिसरातून डझनभरमोटरसायकल चोरणारा रेकाॅर्डवरचा अट्टल गुन्हेगार धन्या उर्फ धनंजय पिंपळे याला वाळूज औद्योगिक पोलिसांनी ३लाख २०हजारांच्या १२मोटरसायकलसह अटक केली.अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
धनंजय पिंपळे उर्फ धन्या(३०) रा. वाळूज औद्यौगिक परिसर असे चोरट्याचे नाव आहे.
१९९५सालापासून औरंगाबाद ग्रामीण आणि शहर पोलिसांनी अनेकवेळा त्याला मोटरसायकल चोरींच्या गुन्ह्यात अटक केली आहे.धन्या ला बुलेट चोरतांना खबर्‍याने पाहिल्यानंतर पोलिसांना ही मिळाली होती. धन्या रांजणगाव परिसरात आल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सावंत यांनी पथकाला पाठवून त्याला ताब्यात घेतले. त्याची सविस्तर चौकशी केली असता धन्याने शेवगाव, श्रीरामपुर परिसरातून तसेच नाशिक जिल्ह्यातून मोटरसारकली चोरल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शमाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, गौतम वावळे,नवाबशेख, सुधिर सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतलाहोता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!