Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : ताजी बातमी : पुण्यातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटला भीषण आग, ४०० दुकाने जाळून खाक

Spread the love

पुणे  : मुंबईतील भांडूपमधील ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला आग लागल्याची  घटना ताजी असतानाच पुण्यातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी आल्या असून आग विझवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. ही आग इतकी भीषण आहे की, लांबूनही आगीच्या ज्वाला दिसत आहे. या आगीत ४०० दुकाने जाळून खाक झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

दरम्यान फॅशन स्ट्रीटवर अनेक कपड्यांची दुकाने आहे. या दुकानांना आग लागली असून यातून आग पसरल्याची शक्यता आहे. मात्र आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.  फॅशन स्ट्रीट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापडाची दुकाने  आणि गोदामे  असल्यामुळे आग अधिकच पसरण्याची गंभीर भिती व्यक्त केली जात आहे. आग विझवण्यासाठी १६ अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या आगीमुळे आसपासच्या अनेक भागांमध्ये वीज गेल्याचीही माहिती मिळत आहे.

पुण्यातल्या एमजी रोडवर असणाऱ्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये ही आग लागली आहे. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्यामुळे या भागामध्ये जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठी कसरत करावी लागली. हे अडथळे पार करून काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शुक्रवारी पहाटेच पुण्याच्या गंजपेठ भागामध्ये एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या भांडुप भागामध्ये ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेला काही तास उलटले असतानाच पुण्यात आगीची ही घटना घडली आहे. त्यामुळे वारंवार आगीच्या दुर्घटना का घडतायत? असा सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे गुरुवारी रात्री मुंबईतील भांडूप येथील ड्रीम्स मॉलला आग लागल्याची घटना ताजी असताना पुण्यातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीलला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. पिंपरी चिंचवडच्याही फायर ब्रिगेड गाड्यांना आग विझवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. येेथे बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे. येथे एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटवरील कपड्यांच्या दुकानांना आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप जीवितहानीबाबत कोणतेही वृत्त समोर आलेली नाही. मात्र या आगीत मोठी वित्त हानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!