Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NewsInTrending : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल

Spread the love

मुंबई : बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल सादर केल्यानंतर आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार का ? याची चर्चा होत असताना आता मुंबईच्या सायबर पोलिसात फोन टॅपिंग अहवाल लीक केल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत टॉप सीक्रेट असलेला अहवाल लीक कसा झाला ? याबाबत आता चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.

आयपीएस रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंग झाले होते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या फोन टॅपिंगमधून बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात एक अहवाल लीक झाला आहे. या अहवालाच्याच आधारे विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईच्या राज्य गुप्त विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय पत्र आणि इतर तांत्रिक गोपनीय माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त केली. यासाठी कलम ३० भारतीय टेलीग्राफ अॅक्ट १८८५,सह माहीती तंत्रज्ञान कायदा २००८ कलम ४३(ब) ६६ सह द ऑफिशियल सिक्रेट अँक्ट, १९२३ च्या कलम ५ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुंबईच्या गुन्हे शाखेअंतर्गत येणाऱ्या सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!