Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : भांडूप येथील सनराइज  हॉस्पिटलला आग , १० जणांचा मृत्यू

Spread the love

मुंबई : भांडूप  येथील सनराइज  हॉस्पिटलला गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे  10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने 6 जणांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर आणखी 4 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढेल का अशी भीती निर्माण झाली आहे. कारण या मॉलमध्ये साधारण 500 ते 600 दुकाने  सुरू होती. मुंबई महापालिकेने 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता. अग्निशमन दलाला याठिकाणी मृतदेह सापडले आहेत.


दरम्यान सुरुवातीला याठिकाणी 2 मृतदेह सापडले होते. त्यावेळी हॉस्पिटलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, या रुग्णांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाला आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू आगीमुळे झाला की कोरोनामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता बीएमसीने असे  स्पष्टीकरण दिले आहे की,  सहा जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी अद्याप हे अस्पष्ट आहे की मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश आहे का? की मॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या इतर लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे?

‘भांडूपमध्ये ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयापर्यंत या आगीचा धूर पोहोचला.सर्व फायर अलार्म वाजल्यानंतर धुरातून सर्व रूग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याठिकाहून 2 मृतदेह  बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व रुग्णांना तातडीने जंबो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले (आणि काही इतर खासगी रुग्णालयात) आहे. लोकांचे प्राण वाचविण्यास मदत केल्याबद्दल मुंबईकर अग्निशमन दलाचे आणि मुंबई पोलिसांचे आभारी आहोत.’

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग भडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात ७६ जण उपचार घेत होते. त्यातील ७० रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे. त्यात काही करोना रुग्णांचाही समावेश आहे. लेव्हल ४ ची ही आग असून अग्निशमन दलाचे २३ बंब घटनास्थळी आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या. तिथे  त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना केल्या. ‘एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचे  मी प्रथमच पाहते आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल,’ असे  महापौर पेडणेकर यांनी सांगितले .

दरम्यान ड्रीम्स मॉलमधील आगीमुळं भांडुप सोनापूर ते गांधी नगर जंक्शन (कंजूरमार्ग) पर्यंत लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सर्व गाड्या पूर्व द्रुतगती मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!