Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल

Spread the love

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज(शुक्रवार) सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त  आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे. छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले . सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती दोन दिवसांच्या हरिद्वार दौऱ्यावर जाणार होते, पतंजली योगपीठाचा जो पदवीदान समारंभ आहे, यामध्ये राष्ट्रपती सहभागी होणार होते. मात्र मध्येच त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा हा दौरा रद्द करावा लागलेला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!