Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BhandupHospitalFireUpdate : हॉस्पिटलमधील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी , चौकशीचे आदेश

Spread the love

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीचे वृत्त समजताच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलगिरी व्यक्त करत मदत केली जाईल असे  आश्वासन दिले  आहे. महत्वाचे  म्हणजे कोरोना संकटामुळे मॉलला तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयाच्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे  सांगत गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.


या  रुग्णालयात एकूण ७८ लोक दाखल होते. यामधील १० जणांचा मृत्यू झाला असून इतर ६८ जण इतर रुग्णालयात दाखल झाले आहेत तर काहीजण घरी गेले आहेत. ती यादी आमच्याकडे आहे. गुरुवारी येथे ८४ लोक आले होते, ज्यामध्ये ५० पुरुष आणि ३४ महिला होत्या. पाच ते सहा जणांबद्दलची माहिती आम्ही अद्याप मिळवत आहोत,” अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

कायद्यानुसार कारवाई केली जाईल : मुख्यमंत्री

दरम्यान यावेळी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, “काल रात्री आपण कोविडसाठी काही ठिकाणी तात्काळ आणि तात्पुरत्या पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णालयाची परवानगी दिली होती. त्यातलेच एक हे मॉलमध्ये तयार केलेले रुग्णालय होते . आपण राज्यभर जिथे शक्य असेल तिथे आवश्यकतेनुसार कोविड सेंटर आणि रुग्णालयांसाठी परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे हे रुग्णालय सुरु होते . ही तात्पुरती परवानगी होती आणि ३१ तारखेला संपत होती . दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ठिकाणी आग लागली आणि पसरत वर गेली. तिथे जे करानो रुग्ण दाखल होते तेथील सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण काही जण व्हेटिलेटरवर होते त्यांना काढण्यास वेळ लागला. इतर रुग्णांची सुटका झाली पण त्यांची सुटका करण्यात वेळ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला,” असे  उद्धव ठाकरेंनी सांगितले .

“अशा दुर्घटना झाल्यानंतर आपण सगळे जागे होतो आणि चौकशी सुरु होते. या बाबतीतही चौकशी केली जाईल. जर याच्यात कोणाचा दोष असेल तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असे  आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले . “जिथे अशी हॉस्पिटल्स, कोविड सेंटर आहेत त्यांचं फायर ऑडिट करा आणि अशा दुर्घटना होऊ देऊ नका अशा सूचना केल्या आहेत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!