Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : खंडपीठाने पोलिस उपनिरीक्षकाला केला ५ हजार रुपयाचा दंड

Spread the love

औरंगाबाद : नांदेड वजीराबाद पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने न्या.रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांच्या खंडपीठाला आरोपपत्र सादर करतांना चिटफंड प्रकरणाचा बोगस अहवाल सादर केला.व त्या सहाय्यक पोलिस निरिक्षकाची बदली झाल्यामुळे सध्या असलेल्या पोलिस उपनिरीक्षकांना त्याचा फटका बसला त्यामुळे वेतनातून ५ हजार रु.दंड कपात करुन भरण्याचे आदेश दिले आहेत.

नांदेडच्या वजीराबाद परिसरातील गणेश मुंदडा यांची मुंदडा चिटफंड नावाची कंपनी आहे. मुंदडा यांनी नांदेडमधील शेकडो नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली.व मूळ दस्तऐवजासहित फरार झाला. या प्रकरणी २०१९ मधे नांदेडच्या वजीराबाद पोलिस ठाण्यात सचिन काकानी आणि इतरांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचा तपास वजीराबाद पोलिस ठाण्याचे तत्कालिन एपीआय सुनिल बडे यांच्याकडे होता.त्यांनी या प्रकरणात आरोपपत्र दाख
ल करंत तपासाचा असमाधानकारक अहवाल खंडपीठाला सादर केला. हा प्रकार खंडपीठाच्या निर्दशनास आला.परंतू एपीआय बडे यांची नाशिक येथे बदली झाल्यामुळे मुंदडा चिटफंड प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सौमित्रा मुंढे यांच्याकडे आला होता. दरम्यान या प्रकरणात जानेवारी २०२१मधे पोलिसांनी तपासात काय प्रगती केली अशी विचारणा खंडपीठाने नांदेड वजीराबाद पोलिसांकडे केली होती.व तसा अहवाल पाठवण्यास सांगितला. व १५मार्च रोजी खंडपीठात हजर राहण्याचे आदेश न्यायमूर्तींनी जारी केले होते.

सध्या मुंदडा चिटफंड प्रकरणाचा तपास पीएसआय सौमित्रा मुंढे करंत आहेत. त्यामुळे त्या खंडपीठात हजर झाल्या असता एपीआय बडे यांनी असमाधानकारक अहवाल खंडपीठाला का पाठवला त्याचे कारण खंडपीठाने सध्या तपासाधिकारी असलेल्या पीएसआय मुंडे यांना विचारला. पण त्यांना उत्तर न देता आल्यामुळे खंडपीठाने पीएसआय सौमित्रा मुंडे यांच्या वेतनातून ५ हजार रु.कपात करुन ती रक्कम खंडपीठाकडे जमा करावी असा आदेश जारी केला व त्याची एक प्रत नांदेड पोलिस अधिक्षकांना पाठवली. तसेच येत्या ९ एप्रिल पर्यंत मुंदडा चिटफंड प्रकरणाचा समाधानकारक अहवाल पाठवण्याचे आदेश वजीराबाद पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात याचिकाकर्ते काकानी यांच्या तर्फे अॅड.प्रसाद जरारे यांनी काम पाहिले तर सरकार तर्फे अॅड.के.एस. पाटील यांनी काम पाहिले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!