Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : मुलगी झाली म्हणून विष दिले : तपासात हलगर्जी पणा करणाऱ्या  पीएसआयवर  कारवाई करण्याचे खंडपीठाचे आदेश

Spread the love

औरंगाबाद – मुलगी झाली म्हणून बाळंतपणाहून सासरी परत आलेल्या विवाहितेला विष पाजून रस्त्यावर टाकणार्‍या कुटुंबियावर पाचोड पोलिस उपनिरीक्षक कारवाई करंत नसल्यामुळे पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना न्या.रविंद्र घुगे आणि बी.यू. देबडवार यांच्या खंडपीठाने संबंधित प्रकरणाचा तपास स्वता:च्या मार्गदर्शनाखाली करुन हलगर्जी पीएसआयवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत

गेल्या २५आँगस्ट २० रोजी पाचोड जवळील पारुंडी तांडा येथे राहात असलेल्या दिनेश राठोड याने बायकोला मुलगी झाली म्हणून मोठा भाऊ व वडलांच्या मदतीने दिनेश ची बायको वर्षा राठोड आठ महिन्याच्या मुलीसह गळ्यात ओढणी अडकवून फरफटत रस्त्यावर आणले व तोंडात विष टाकून  वर्षा राठोड हिला बेशुध्द अवस्थेत रस्त्यावर सौडून तांड्यावर परतले हौते. दरम्यान वर्षा रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत पडल्यानंतर मुलीच्या रडण्यामुळे शुध्दीत आली. तिने माहेरी भावाला फोन करुन सर्व प्रकार सांगितला. वर्षावर उपचार झाल्यावर या प्रकरणी वर्षाचा नवरा दिनेश, भाया दिलीप आणि सासरा बाबुलाल यांच्या विरोधात पाचोड पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ रोहिदास खरड यांच्याकडे हौता पण गुन्हा घडून तीन महिने झाल्यानंतरही पीएसआय खरड तपास करंत नव्हते. म्हणून फिर्यादी वर्षा राठोड यांनी खंडपीठात धाव घेतली. वरील प्रकरणाचे तपशील खंडपीठाने जाणून घेतले व पोलिस अधिक्षक औरंगाबाद यांना वरील आदेश जारी केले. याप्रकरणी याचिका कर्त्यातर्फे अॅड.महेश तौर यांनी काम पाहिले.तर सरकार तर्फे अँड.डी.आर. काळे व अॅड.एस.जी सांगळे यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!