Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुनिया : मुलाने घरामध्ये पॉर्न चित्रपट पाहिल्याची शिक्षा झाली त्याच्या कुटुंबियांना आणि मुख्याध्यापकाला…

Spread the love

प्योंगयांग : उत्तर कोरियामध्ये  एका अल्पवयीन मुलाने घरामध्ये पॉर्न चित्रपट पाहिल्याची शिक्षा केवळ त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांनाच  नव्हे तर त्याच्या मुख्याध्यापकांनाही भोगावी लागली असल्याचे वृत्त आहे. उत्तर कोरिया सरकारने मागील वर्षापासून पॉर्न चित्रपट, साहित्याविरोधात मोहीम सुरू केली आहे.

याबाबत उत्तर कोरियामधील घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘एनके न्यूज’ दिलेल्या वृ्त्तानुसार, पॉर्न चित्रपट पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे आदेश राष्ट्रपती किम जोंग उन यांनी दिले आहेत. या शिक्षेमुळे इतरांमध्ये त्याची भीती निर्माण होईल. उत्तर प्योगान प्रांतात रात्री उशिरा पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला घरातून अटक केली. घरात आई-वडील नसताना तो पॉर्न चित्रपट पाहता होता. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना उत्तर कोरियातील एका दुर्गम भागात पाठवण्यात आले आहे. तर, आरोपी मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांची रवानगी ‘लेबर कॅम्पम’ध्ये करण्यात आली आहे. आगामी काळात अशा प्रकारची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या वृत्तानुसार पॉर्न चित्रपटाविरोधात उत्तर कोरियात कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार, दोषी आढळणाऱ्यांना पाच ते १५ वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. इतकेच नव्हे तर पॉर्न व्हिडिओ, साहित्य आयात करणाऱ्यांना ‘लेबर कॅम्प’ मध्ये आजीवन कारावास ते मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. पॉर्न विरोधी कायद्याची लवकरच कठोरपणे अंमलबजावणी होण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. उत्तर कोरियातील सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून शाळांमध्ये पॉर्नविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!