Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मनसुख हिरेन यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे हत्याच , पहा कसा लागला तपास ?

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या रॅपिड इन्व्हेस्टीगेशन थिअरीवरून ठाण्यातील व्यापारी मनसुख मिश्रीलाल हिरेन यांचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला नसून त्यांचा खुनाचा झाल्याचा तपास एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे  यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लावण्यास यश मिळवले आहे . ज्याचा उल्लेख दोन दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पोस्टवरून केला होता.


अखेर हा खून कसा झाला याचा छडा लागला असल्याचे वृत्त आहे . मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवलेली कार सापडली होती. हि कार ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचे उघड होताच त्यांच्या मागे या प्रकरणाच्या चौकशीचा ससेमिरा लागला. त्यानुसार त्यांची चौकशी सुरूही झाली परंतु अचानक त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला होता.  प्रारंभी समुद्राच्या खाडीत उडी मारून त्यांनी  आत्महत्या केली अशी चर्चा होऊ लागली होती. परंतु मनसुख यांची हत्या करण्यात आली आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबाकडून झाल्यानंतर अज्ञात लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सरकारकडून एटीएसकडे देण्यात आला. या विषयावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रणकंदन माजवले होते. यावरून मुख्यमंत्र्यांनी  यावर उत्तर देत  तपासाचे आदेश दिले होते.

बहुचर्चित एपीआय सचिन वाझे यांना अटक

दरम्यान या विषयावरून इतके राजकारण झाले कि , केंद्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटके आढळलेल्या कारचा तपस एनआयए कडे दिला . या तापाच्या पहिल्याच फटक्यात पोलिसांनी संशयावरून  बहुचर्चित एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने बहुचर्चित एपीआय सचिन वाझे याला तत्काळ निलंबित करून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली. त्यानंतर या बदलीविरुद्ध परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले असून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी मासिक हप्तावसुलीचा खळबळजनक आरोप केला आहे.

तपासाचे तीन शिलेदार

अशा प्रकारे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी आव्हान म्हणून मनसुख हिरेन यांच्या रहस्यमय मृयूचा तपस स्वीकारला. या तपासानुसार ठाणे पोलिसांच्या हद्दीत मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख यांचा मृतदेह सापडला होता . मात्र मनसुख यांच्या मृत्यूवरून संशय व्यक्त केला जाऊ लागला. अखेर हा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यास सरकारला भाग पडले.  या तपासासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे एसीपी श्रीपाद काळे,  डीसीपी राजकुमार शिंदे आणि स्वतः  शिवदीप लांडे या तिघांनी मिळून मनसुख यांच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला होता, यात कोण कोण सामील होते ?  मनसुख यांची हत्या कशी करण्यात आली, मृतदेहाची कशी विल्हेवाट लावण्यात आली अशा विविध अँगलने तपास केला.

बहुचर्चित दया नायकचाही तपासात सहभाग

दरम्यान  या सर्व प्रकरणात एसीपी श्रीपाद काळे डीसीपी राजकुमार शिंदे आणि डीआयजी शिवदीप लांडे हे तपास करत असताना त्यांना हत्येच्या तसेच आरोपींच्या अनेक लिंक मिळाल्या होत्या. मात्र गुन्हा करणारे हे देखील पोलीस असल्याने आपण कुठे फसवू नये आणि तपास कसा भरकटत जावा या दृष्टीने अतिशय सराईतपणे हा गुन्हा करण्यात आला होता. त्यामुळे त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावणारे एपीआय दया नायक यांनाही तपासकामी नेमण्यात आले. दया नाईक सध्या एटीएसच्या जुहू युनिट मध्ये कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी या प्रकरणात नसती आफत  नको म्हणून तपास करण्यास नकार दिला होता. परंतु वरिष्ठांच्या आदेशामुळे  त्यांनी त्यांचे सर्व नेटवर्क ऍक्टिव्ह करत काही तासांतच या कटात कोण सामील होतं आणि हा कट कसा रचला गेला त्यामागचे धागेदोरे शोधून काढत सर्व माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि सुरुवातीपासूनच विविधांगी तपास करून एका विशिष्ट वळणापर्यंत येऊन पोहोचलेल्या तपासाला दया नाईक यांच्या तपासामुळे वेग मिळाला.

दोन पोलिसांसह अकरा लोकांचा कटात सहभाग

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार हे सर्व होत असताना दुसरीकडे मात्र मनसुख यांच्या हत्येचा तपास हा एनआयएकडे सोपविण्यात यावा ही चर्चा होऊ लागली आणि आता तपास तिकडे जाणार तोच या सर्व अधिकाऱ्यांनी आपले सर्वस्वपणाला लावले. या सगळ्यांनी आटोकाट मेहनत घेत जमा केलेले पुरावे आणि तपासाची दिशा ही वरिष्ठांना समजून सांगितली त्यानुसार, 20 मार्चला एटीएसने निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुक्की नरेश गोर या दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि अकरा लोकांनी मिळून मनसुख यांच्या हत्येचा कट कसा रचला याचा उलगडा झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!