MaharashtraWeatherUpdate : सावधान : “या” चार जिल्ह्यात गारपीट , वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबई हवामान विभागाने (IMD ) दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून  अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना दोन दिवसात झोडपले असताना हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार  पुढच्या तीन तासांत चार  जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात जोरदार गारपीटही होऊ शकते, असा इशाराही  हवामान विभागाने  दिला आहे.

Advertisements

हवामान विभागाचे डॉ. के. एस होसाळीकर यांनी याबाबत Tweet करून  दिलेल्या माहितीनुसार , नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाद जिल्ह्यांत पुढचे तीन  तास धोक्याचे असतील. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज इथे जमा झालेल्या उंचीवरच्या ढगांवरून देण्यात आला आहे.  दिली आहे. रात्री 10 वाजता हवामान विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अधिक उंचीवर दाट ढग जमा झाल्याने नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी मोठ्या गारा  पडण्याचीही शक्यता आहे. ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. या वादळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान विजांचा पाऊस सुरू झाल्यास शक्यतो गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, झाडाखाली किंवा मोडकळीला आलेल्या इमारती, भिंतीखाली उभे राहू नका, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे  गेल्या तीन दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोठे  नुकसान झाले  आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हाताशी आलेली  पिके आडवी झाली . नव्या अंदाजानुसार अजूनही पुढचे काही दिवस या अवकाळी पावसाच्या ढगांचे  महाराष्ट्रावर संकट राहील असे सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार