Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : रविशंकर प्रसाद गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम तर अमित शहा यांचा मुख्यमंत्र्यांना नैतिकतेचा पाठ

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नैतिकतेचा उपदेश दिला आहे तर केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील ठाकरे सरकारवर टीका करतानाच थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार नेमक्या कोणत्या कारणामुळे अनिल देशमुख यांना पाठिशी घालत आहेत?” असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.


हा विकास नव्हे, वसूली !

दरम्यान रवीशंकर प्रसाद यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. “हा महाराष्ट्र शो नेमकं कोण चालवत आहे? हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात कन्फ्युज सरकार आहे का? या वसूली आघाडीची राजकीय दिशा काय आहे? शरद पवार अनिल देशमुखांना पाठिशी का घालत आहेत?”, अशा शब्दांत रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे.

“अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल”, असा देखील निशाणा रवीशंकर प्रसाद यांनी साधला आहे. महाराष्ट्रात देखील एक खेला सुरू आहे, असे  प्रसाद म्हणाले. “महाराष्ट्रात सध्या दे सुरू आहे, तो विकास नसून ती वसूली आहे”, असेही  ते यावेळी म्हणाले.

अमित शहा यांनी दिला  नैतिकतेचा उपदेश

दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवाची भेट घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील पुरावे देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली . या भेटीची दखल घेत  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यातून वेळ काढून  महाराष्ट्र पोलिसातील वसुली प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना आपण कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि त्यांनी विचार केला पाहिजे, असा उपदेश केला आहे.

त्यांच्या मते  ‘हा प्रश्न फक्त पोलीस आयुक्तांचा नाही. तर इतर निरीक्षकांनीही केंद्र सरकारला पत्र लिहिली आहेत. पण मी सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे’, अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याच्या प्रश्नावरही शहांनी उत्तर दिले . मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठलाही सल्ला देणार नाही. पण हा प्रश्न नैतिकतेचा आहे. त्यांनी विचार केला पाहिजे, असं शहा म्हणाले. शरद पवारांना काही सल्ला देणार का? असं विचारल्यावर शहांनी नकार दिला. अमित शहा यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला यासंदर्भात मुलाखत दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी जो अहवाल दिला आहे तो आपण आरामात बघू. पण हा नैतिकतेचा प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र सरकारने आपली नैतिकता दाखवली पाहिजे, असे  शहा म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील आयपीएस आणि नॉन आयपीएस पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यांना पुरावेही दिले. तसंच या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. तर या प्रकरणाची योग्य दखल घेऊन सरकार नक्कीच कारवाई करेल, असे आश्वासन केंद्रीय गृह सचिवांनी फडणवीस यांना दिले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!