Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

परमबीर सिंह यांच्या पत्राचे पडसाद लोकसभेतही उमटले…

Spread the love

परमबीर सिंह माजी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या पत्राचे पडसाद लोकसभेतही उमटले. भाजप खासदारांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी केंद्रीय तपास संस्थांकडून, तपास करण्याची मागणी  केली आहे. दरम्यान, भाजप खासदारांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणावर मौन बाळगून आहेत असा आरोप  करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, शिवसेना आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचे सांगितले आहे.

भाजपचे मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी हा मुद्दा लोकसभेत शुन्यप्रहारात उपस्थित केला. राज्य सरकार उद्योगपती, व्यापाऱ्यांना धमकावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्यातील लोकांचे मत बनत असल्याचा दावा कोटक यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. तसेच, भाजपचे खासदार राकेश सिंग यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली. रविवारपर्यंत राष्ट्रवादीचे नेते हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत होते. आता मात्र गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात यावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना खासदार विनायक राऊचत यांनी भाजपवर निशाणा साधला. मागील १४ महिन्यांच्या प्रयत्नानंतरही भाजपला राज्यातील सरकार पाडता आले नाही. त्यामुळेच आता भाजप केंद्र सरकारच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे विनायक राऊत म्हणाले. ज्या पोलीस आयुक्तांच्या पत्रावर एवढी चर्चा सुरू आहे, त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप असल्याचे ही विनायक राऊचत यांनी यावेळी सांगितले.

आज शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत “परमबीर सिंह यांनी उल्लेख केलेल्या दिवसांमध्ये अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते”, असे म्हंटल्या नंतर भाजपाकडून अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच उलट सवाल विचारण्यात येत आहेत. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले; मला कोविड झाल्यामुळे मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या विषयी शरद पवारांचे स्पष्टीकरण

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्या विषयी शरद पवारांचे स्पष्टीकरण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!