Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिव्यक्ती | बातचीत : कोरोना : भय इथले संपत आहे काय ? एक निरीक्षण | डाॅ.सुंदर कुलकर्णी

Spread the love

जगदीश कस्तुरे | औरंगाबाद 

आज पासून एक वर्षापूर्वी कोरोना महामारीमुळे जी भयावह परिस्थिती होती. ती आता नाही. या मार्च मधे कोरोनाची लस उपलब्ध आहे . या पार्श्वभूमीवर सहजच मागच्या वर्षभरातील घटना आठवल्या नंतर औरंगाबाद ची मिनी घाटी म्हणून ओळख असलेल्या कोविड हॉस्पिटल प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी ‘महानायक ऑनलाईन’ जवळ व्यक्त केलेल्या या मुक्त भावना…

कोरोना विषयी वाटणारी ती भिती, ते दिवसभर कडक अंमलबजावणीचे लाॅकडाऊन ,जिल्हा बंदी, बाहेर फिरण्यासाठी लागणार्‍या प्रशासनाच्या परवानग्या…पण,  या सगळ्या अडचणी आता  संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयीची दहशत संपली. मागच्या वर्षी एखाद्या कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी अॅडमिट होण्यासाठी म्हणा किंवा करण्यासाठी म्हणा.. सर्वांनाच मोठ्या दिव्यातून जावं लागत असे.पण आता असे होताना दिसत नाही. आता या वर्षी पूर्ण कुटुंब पाँझिटिव्ह निघाले तरी  ते सर्व आरामात अॅडमिट व्हायला येतात. कोणालाही कोरोनाची भीती म्हणून काही उरले नाही. मागच्या वर्षी एखाद्या गल्लीत कोरोना चा पेशंट आहे असे समजले तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जायचा गल्ली केली जायची या अनुभवातून आलेले आहेत त्यांच्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही.

दरम्यान प्रत्येक गोष्टीवर काळ हेच एकमेव उत्तर आहे त्याची प्रचिती कोरूना च्या निमित्ताने ही येत आहे गेल्या महिनाभरापासून करुणा संसर्गाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे मात्र आता लोकांच्या मनात पूर्वीसारखे दहशत जाणवत नाही सरकार कडून कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले जाते मात्र या आवाहनाला लोक किती प्रतिसाद देतात याची प्रचिती येत आहे. आता हेच पहा ना कोरोना विषयक नियमांमध्ये मास्क वापरणे सोशल डिस्टंसिंग चा वापर या गोष्टी करणे बंधन कारक आहे मात्र बाहेर फिरल्यानंतर चित्र वेगळेच दिसते अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. मास्क न वापरल्यामुळे एक तर लोक दंड भरतात, गुन्हे दाखल करुन घेतात किंवा महापालिकेच्या पथकाला मारहाण करतात. काही लोक सॅनेटायझरचा बर्‍यापैकी वापर करत असले तरी सोशल डिस्टंसिंगचा नियम मात्र कुणीही पाळताना दिसत नाही.  पूर्वी प्रत्येक दुकानासमोर विशिष्ट अंतर ठेवून गोल राऊंड मारलेले होते आता मात्र त्याचे आता कोणीही पालन करताना दिसत नाही,  याउलट लोक पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून दुकानात, मॉलमध्ये,  बसमध्ये, बँकेत, रुग्णालयात बसमध्ये,  रेल्वेमध्ये,  बाजारात, लोकलमध्ये  बिनधास्त उभे असताना दिसतात. यावर कसे नियंत्रण करणार मोठा प्रश्न आहे.

जेव्हा कोरोना विषयीच्या जगभरातल्या बातम्या वाचायला आणि बघायला मिळायच्या तेव्हा रुग्णांत बरोबरच डॉक्टरांमध्येही भीतीचे वातावरण होते आता मात्र आम्ही बघत आहोत की,  कोरोनाग्रस्त रुग्ण डाँक्टरांशी मध्यरात्रीनंतर उपचारस्थळी खुर्ची टाकून गप्पा मारत असलेले दिसतात. जे व्हायचं ते होऊ द्या., कोरोनाचे नियम पाळायचे नाहीत असा रवैय्या नागरिकांचा दिसतो. त्यात लोकप्रतिनीधीही नागरिकांच्या पाठीशी असल्याचे व्हिडीओ सोशलमिडीयावर धुमाकुळ घालत आहेत. यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.

या घटनाक्रमामुळे पोलिस प्रशासन, महापालिका, जिल्हाप्रशासन या विभागात प्रत्यक्ष कोरोना मोहिमेत राबणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांनाही लाॅकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश कशाप्रकारे राबवावेत याबाबत संभ्रम निर्माण न झाला तरंच नवल !!  बरं लोकप्रतिनिधींकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य न करण्याची भूमीका घेणं यातून वेगळाच संदेश समाजात जातो. यातून नेमकं काय साध्य होणार ? ते हे लोकप्रतिनिधीच जाणोत !!

बरे रुग्ण म्हणून ज्यांचा कोरोनाशी संबंध आहे क्या जनतेने तरी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे पण हे कोण कोणाला सांगणार ? असा प्रश्न यातून निर्माण होतो आहे यापासून काळजी घेणे राहिले दूर परंतु कोरोना खरा की खोटा यावरच जनतेत चर्चा झडताना दिसून येत आहेत हे अत्यंत गंभीर आहे.

संवाद | डॉ. सुंदर कुलकर्णी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!