Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Budget 2021 : एका क्लिक वर जाणून घ्या अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

Spread the love

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील काही मोठ्या घोषणा ;

  • महिलांच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत
  • ग्रामीण तालुक्यातील शाळकरी मुलींना एसटी प्रवास मोफत, 1500 हायब्रीड बसची व्यवस्था
  • परिवहन विभागाला 2500 कोटी, बस स्थानकांसाठी 1400 कोटी
  • तीन लाखांपर्यंतचं पीक कर्ज वेळेत फेडल्यास शून्य टक्के व्याज
  • पुण्यात रिंग रोडची घोषणा, 24 हजार कोटींचा निधी
  • कोरोना संकटातील आरोग्य सेवेसाठी सात हजार कोटींचा निधी
  • पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार
  • सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
  • राज्यातील आठ प्राचीन मंदिरांचा विकास करणार
  • राज्यात युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी, या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार

#Live | Maharashtra Budget 2021 

3:10 PM | 08 MAR 2021
महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी दिडशे कोटी उपलब्ध करून देण्यात येतील, MPSC च्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद

3:07 PM | 08 MAR 2021
साखर व्यवसायाचा इतिहास व माहिती देणारे संग्रहालय पुण्यातील साखर संकुलात उभारण्यात येईल.

3:07 PM | 08 MAR 2021
निसर्ग पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन धोरण जाहीर करणार.

3:06 PM | 08 MAR 2021
घरकाम करणाऱ्या महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी संत जनाबाई यांच्या नावाने योजना, त्यासाठी 250 कोटी रुपये बीजभांडवलाची तरतूद : अजित पवार

 

3:04 PM | 08 MAR 2021
राज्यातील आठ मंदिरांचं संवर्धन करणार, पहिल्या टप्प्यात या मंदिरांसाठी 101 कोटींची तरतूद

3:01 PM | 08 MAR 2021
कोरोनाच्या काळातही राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक आली. विविध उद्योगांशी केलेल्या करारांच्या माध्यमातून राज्यात 1.12 लाख कोटींची औद्योगिक गुंतवणूक येणार आणि या माध्यमातून 3 लाख नवे रोजगार अपेक्षित आहेत.

 

3:00 PM| 08 MAR 2021
कोल्हापूर विमानतळाला नाईट लँडिंग आणि त्याचबरोबर सोलापूरच्या बोरामनी विमानतळाच्या क्षमता वाढीसाठीही भरीव निधी

2:58 PM | 08 MAR 2021
पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटींची तरतूद : अर्थमंत्री अजित पवार

 

2:58 PM | 08 MAR 2021
डोंबिवली, मिरा-भाईंदर, कोलशेत या ठिकाणी जेट्टी उभारणार : अर्थमंत्री अजित पवार

 

2:58 PM | 08 MAR 2021
मुंबईसाठी महत्वाच्या असलेल्या कोस्टल रोडचं काम 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार.

 

2:54 PM | 08 MAR 2021
‘बर्ड फ्लू’ सारख्या रोगांना आळा घालण्यासाठी पुणे येथे जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणार

 

2:54 PM | 08 MAR 2021
रस्ते विकासासाठी 12 हजार 950 कोटींच्या निधीची तरतूद, आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटींची तरतूद : अजित पवार

2:52 PM | 08 MAR 2021
युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. या विद्यापीठातून रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार

 

2:49 PM | 08 MAR 2021
वेरूळचे ऐतिहासिक महत्व जाणून पर्यटन वाढीच्यादृष्टीने नवे विमानतळ उभारणार, तसेच, पुण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार. : अजित पवार

2:47 PM | 08 MAR 2021
जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी 3000 कोटींची तरतूद : अजित पवार

2:46 PM | 08 MAR 2021
ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस उपलब्ध करून देणार, मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार : अजित पवार

2:44 PM | 08 MAR 2021
महिला दिनी मोठी घोषणा, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार : अजित पवार

 

2:43 PM | 08 MAR 2021
घरकुल योजनेसाठी 6800 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून गरिबांना हक्काचे घर मिळण्यास मदत होईल : अजित पवार.

 

2:38 PM | 08 MAR 2021

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद : अजित पवार

 

2:33 PM IST | 08 MAR 2021
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार : अजित पवार

 

2:30 PM | 08 MAR 2021
बस स्थानकांच्या विकासाठी 1,400 कोटींची तरतूद, परिवहन विभागासाठी 2570 कोटींची तरतूद : अजित पवार

 

2:24 PM | 08 MAR 2021
जलसंपदा विभागासाठी 12,919 कोटींची तरतूद, पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी 3,700 कोटींची तरतूद : अजित पवार

 

2:21 PM IST | 08 MAR 2021
गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी : अजित पवार

2:19 PM | 08 MAR 2021
कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणार, 2021- 22 कृषी पशु संवर्धन योजनेसाठी 3274 कोटी प्रस्तावित : अजित पवार

2:15 PM | 08 MAR 2021
एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2 हजार कोटींच्या योजनेची घोषणा, कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी 1,500 कोटींचा महावितरणला निधी, विकेल ते पिकेल योजनेला 2100 कोटी : अजित पवार

2: 13 PM | 08 MAR 2021
3 लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज : अजित पवार

 

2:12 PM | 08 MAR 2021
उद्योग सेवा क्षेत्रात घट झाली, कृषी क्षेत्रात 11% वाढ झाली आहे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणूण प्रयत्न केले : अजित पवार

 

2:11 PM | 08 MAR 2021
कोविड पश्चात प्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र उभारणार, तसेच प्रत्येक रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे लावण्यात येणार आहे : अजित पवार

 

2:08 PM | 08 MAR 2021
कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद; सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार: अजित पवार

2:07 PM | 08 MAR 2021
राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद, नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार : अजित पवार

2:03 PM | 08 MAR 2021
कोरोनाच्या संकटाचे आव्हान देशासमोर आहे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे या प्रमाणे काम करावे लागत आहे : अजित पवार

 

2:01 PM | 08 MAR 2021 :
अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडत आहेत, सुरुवातीला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या

आपलं सरकार

Click to listen highlighted text!