Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात वाढले तब्बल ११ हजार नवे रुग्ण , ३८ मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात  राज्यात तब्बल ११ हजार १४१ करोनाबाधित वाढले असुन, ३८ रूग्णांच्या मृत्युंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.३६ टक्के एवढा आहे. आतापर्यंत राज्यात ५२ हजार ४७८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ९७,९८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ही आकडेवारी सर्वसामान्यांसह राज्य सरकारची चिंता वाढवणारी आहे.

दरम्यान, आज ६,०१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण २०,६८,०४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९३.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!