Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कोरोना सेंटरमध्ये नेमके काय झाले ?

Spread the love

औरंगाबाद बुधवारी मध्यरात्रीनंतर पहाटे २ वाजता कोविड सेंटरमधील महिला रुग्णाला बाहेर बोलावल्या प्रकरणी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी डाॅक्टरला निलंबित केले असल्याची  माहिती  मनपाच्या आरोग्य अधिकारी डाॅ. निता पाडळकर यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही पण मध्यरात्रीनंतर एखाद्या महिला रुग्णाला फोन करुन बाहेर बोलावणे योग्य नसल्याचा ठपका ठेवत पिंजरकरांना मनपाआयुक्तांनी निलंबित केल्याची माहिती डाॅ.पाडळकरांनी दिली.

बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ.अस्तिककुमार पांडे यांनी या प्रकरणाचा अहवाल आरोग्य  अधिकार्‍यांकडे मागितला होता. तो अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आल्याचे डाॅ.पाडळकर यांनी सांगितले.अहवालामधे कोविड सेंटरमधील सी.सी.टि.व्ही.फुटेज तपासण्यात आले. त्यामधे निलंबित डाॅ. पिंजरकर याने त्याच्या ओळखीच्या महिला रुग्णाला बाहेर बोलावले व बाहेर ते दोघे खुर्चीवर बसून गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. महिलेनेही डाॅक्टरशी जुनी ओळख आहे असा खुलासा महापालिकेच्या चौकशी पथकाला केला. डाॅ.पिंजरकर हे कंत्राटी डाॅक्टर म्हणून कोविड सेंटरमधे काम करंत होते.

डिस्चार्ज देण्याच्या बहाण्याने रात्री दोन वाजता कोरोनाबाधित महिलेला केबिनमध्ये बोलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.  महापालिकेचा  हा डॉक्टर व संबंधित महिला एकमेकांच्या ओळखीचे असून दोघांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये ४० मिनिटे गप्पा मारल्याचेही  सीसीटीव्हीमधून समोर आहे, असेही   डॉ. पाडळकर यांनी सांगितले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर महापालिकेने कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक केली होती . यामध्ये सदरील डॉक्टरची गतवर्षी मे महिन्यात नेमणूक करण्यात आली होती. तो पदमपुरा येथे कार्यरत होता. दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये २५ वर्षीय महिला दाखल झाली होती. तिला पाच मार्चला डिस्जार्ज दिला जाणार होता. मात्र ही महिला डिस्चार्जची मागणी करत होती. त्यामुळे सदरील डॉक्टर याने रात्री दोन वाजता महिलेला मोबाईलवरून संपर्क साधत तुम्हांला डिस्चार्ज द्यायचा आहे, केबिनमध्ये या असे सांगितले. यावेळी संबंधीत डॉक्टरनी आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार रात्री उशिरापर्यंत प्रकरणाची चौकशी करून अहवाल प्रशासकांना सादर करण्यात आला आणि  त्यांनी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्याचे आदेश दिले.

विधिमंडळापर्यंत गेले प्रकरण

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टराला महापालिका प्रशासनाने निलंबित केल्याचे उत्तर दिले.

डॉक्टर होता लग्नासाठी सुटीवर

संबंधीत डॉक्टरहा स्वतःच्या लग्नासाठी महिनाभर सुटीवर होता. दोन दिवसांपूर्वीच तो रुजू झाला होता. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. दरम्यान मंगळवारी रात्री महिलेच्या नातेवाइकांनी कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेत डॉक्टर लाबेदम चोप दिला होता. महिलेने बदनामी होईल, म्हणून पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!