Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : दौलताबाद किल्यात आग, ८ तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहराजवळील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला तसेच परिसराला आज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली. आगीने किल्ल्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग व्यापला आहे. रात्री ९ वाजेदरम्यान आग आटोक्यात आली. तसेच आग विजावण्यासाठी दोन बंब आणि टँकर हे आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. आग का लागली याचे कारण समजू शकले नाही.

दौलताबाद किल्ल्याच्या चहुबाजूने आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. किल्ल्याच्या आत देखील आग लागली असून रस्ता नसल्यामुळे अग्निशमन विभागाचा बंब जात नसल्याने कर्मचाऱ्यांना आग विजावाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. औरंगाबाद-खुलताबाद रोडलगत असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत आग विस्तारली होती.

आगीचे लोट दूरदूरपर्यंत दिसत होते. आगीचे रूप मोठे असल्यामुळे शेंद्रा, सिडको, पदमपुरा येथून अग्निशामक दलाचे बंब दौलताबादकडे रवाना होऊन आग विझवण्यासाठी मदत केली. किल्ल्यात तसेच आसपासचा परिसर मोठा असल्यामुळे आग विझवायला विलंब लागला. रात्री उशाराने हि आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!