Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्याची स्थिती चिंताजनक, नवे रुग्ण ९ हजारावर , ४२ जणांचा मृत्यू 

Spread the love

राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय मृत्युंची संख्येतही भर पडतच आहे. विशेष म्हणजे गेले काही दिवस मुंबई, पुण्याहून कोरोना विदर्भाकडे कूच करत असताना आता अचानक त्याने पुन्हा मुंबई-पुण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई-पुण्याचा  कोरोनाचा धोका पुन्हा सर्वात जास्त वाढला आहे. तर औरंगाबाद शहरातही कोरोनाचो घोडदौड चालू आहे.

गेल्या २४ तासात राज्यात ९ हजार ८५५ नवीन करोनाबाधित वाढले असून , ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,०९,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,७९,१८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,६०,५०० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

औरंगाबादेत ७ जणांचा  मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 371कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51287 झाली आहे.तर दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत एकूण 1278 जणांचा मृत्यू झाला आहे . दरम्यान आज 308 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली त्यामुळे  आजपर्यंत 47564 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर एकूण 2445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान पुण्यात दिवसभरात  853 तर मुंबईत 1121 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दरही वाढला आहे. मागच्या आठवड्यात 0.28 टक्के असलेला दर या आठवड्यात 0.29 इतका झाला आहे.

एकूण रुग्ण – 21,79,185

उपचार घेत असलेले रुग्ण – 82,343

दिवसभरातील नवे रुग्ण – 9,855

दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,559

एकूण बरे झालेले रुग्ण – 20,43,349

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 93.77%

दिवसभरातील मृत्यू – 42

मृत्यूचं प्रमाण – 2.40%

आता २४ तास होणार लसीकरण 

राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशावरून जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याच्या आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाप्रभावित जिल्ह्यांमध्ये आरटी-पीआर आणि रॅपिड अँटिजेन दोन्ही टेस्ट कराव्यात. लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करावी, असे  सांगण्यात आले आहे. तसेच आता 24 तास लसीकरण होणार आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या सोयीनुसार लस घेता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना लस मिळेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!